सरकारनामा ब्यूरो
वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना आखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुंबईतील विविध भागांची पाहणी केली.
ही पाहणी करताना त्यांनी मुख्यतः मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ या परिसराला भेट दिली
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई स्वच्छ करण्यासाठीची यंत्रणा व उपकरणांची त्यांनी तपासणी आणि पाहणी केली. या उपकरणांच्या साहाय्याने रस्ते स्वच्छ केले.
मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि कामाचा आढावा घेत 'स्वच्छ सुंदर मुंबई'साठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
वांद्रे आणि खार येथील जॉगर्स पार्कला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला.
ज्येष्ठांसाठी ठिकठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि अन्य सुविधा वाढवण्याची विनंती मुंबईकरांनी मुख्यमंत्र्यांना केली.
मुंबईची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला.
एकनाथ शिंदेंना या पाहणीमध्ये मुंबईतील बऱ्याच समस्या जाणून घेता आल्या. त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी दिला.