Pradeep Pendhare
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविताना सत्ताधारी तिन्ही पक्षात समन्वयाचा अभाव दिसतो.
लाडकी बहीण योजनेत राष्ट्रवादी अजित पवार गट मुख्यमंत्री शब्द वगळला आहे, तर एकनाथ शिंदे गटांनी देखील अजितदादांना टार्गेट केलं आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी विकास कामांचा निधी वगळवा आहे. त्यामुळे विकास कामं ठप्प पडली असून, सर्वसामान्य नाराज आहे.
सिंधुदुर्ग इथल्या मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी तिन्ही पक्षात माफीनाम्यावर समन्वय नाही.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटता ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक भूमिका घेत असताना, दुसरीकडं दोन्ही उपमुख्यमंत्री शांत बसून घेतात.
महायुतीत जागा वाटपाचा घोळ सुरू झाला आहे. तिन्हा पक्ष परस्पर उमेदवार जाहीर करत सुटले आहेत.
महायुतीत मुख्यमंत्रीचा चेहरा कोण असणार यावरून वाद पेटला आहे. शिवसेना यावर आक्रमक असून भाजप आणि संघानं मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हणत आहे.