Vijaykumar Dudhale
मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा आमदार पाडून बार्शीतून दिलीप सोपल यांना निवडून आणायचा विचार केला आहे का? मनोज जरांगेंना कोणाची सुपारी मिळाली?
मनोज जरांगेंचा आधीचा मुद्दा सगेसोयऱ्याचा होता. त्यानंतर त्यांनी ओबीसींचा मुद्दा त्यांनी काढला. विरोधी पक्षाचे नेते आरक्षण ओबीसीतून सोडून बोला, असं सांगत आहेत. जरांगे पाटलांमुळे लोकसभेत विरोधकांना झुकतं माप गेलं, त्यामुळे त्यांनी आता विरोधकांकडून ओबीसीतून आरक्षण मागावे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यापैकी कोणाचीही चूक दाखवा, आम्ही त्यांना बोलू. शंभर-पन्नास मतं असलेल्या समाजालाही कोणी दुखावत नाही. मग सहा कोटी मराठा समाजाला दुखावण्याचं धाडस कोणामध्येच नाही, त्यामुळे सत्ताधारी ते धाडसं कसं करतील?
तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? प्रश्न विचारला म्हणून त्यांनी चिडू नये. कारण सार्वजनिक जीवनात काम करताना आपण मालक राहिलेलं नसतो, जनता मालक असते.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून मराठा आरक्षण देण्याबाबत लिहून आणण्याची जबाबदारी माझी आहे. ते कसे लिहून देत नाहीत, ते मी बघतो. तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा. तुम्ही दिलेला शब्द पाळा.
आरक्षणाची गरज किती आहे, हे माझी बायको आणि आई-वडील यांनाही माहिती आहे. मात्र, माझी बायको आणि आई-वडील तुम्हाला काही बोलले का? बार्शी तालुक्यातील मराठ्यांची पोरांनी तुम्हाला प्रश्न विचारल्यानं तुमच्या नाकाला झोंबलं का?
माजलगावमधील सभेत जरांगे-पाटील म्हणतात, राजा राऊतच्या दारात सभा घेण्यासाठी जागा आहे का? राजा राऊतच्या दारात सभा घेण्याची आपणाला एवढी खुमखूमी जर असेल तर जरुन सभा घ्या.
कोण मराठ्यांचा माणूस बोलत नव्हता. मात्र, हा पठ्ठ्या राजा राऊत शानमध्ये बोलत होता. किती तुकडे होणार आणि किती तुकडे करायला लावायचे आहेत, याचं भान मलापण राहणार नाही. सभा उधळणे माझे काम नाही. इमानदारीनं या... तुमची सभा घेण्याची जबाबदारी राजा राऊतची असेल
पॅरिस ऑलिंपिक ते काँग्रेस; कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात