Ganesh Sonawane
मतदानावेळी अनेक मतदारांकडे दोन मतदान कार्ड असल्याचे आढळून येत असते.
परंतु दोन मतदान कार्ड बाळगणं तुम्हाला महागात पडू शकतं.कारण तसं करणं कायद्याने गंभीर गुन्हा आहे.
यामुळे तुमच्यावर १९५० च्या कलम ३१ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
निवडणूक आयोगाच्या पडताळणीत जर तुमच्याकडे दोन मतदान कार्ड आढळले तर एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
याशिवाय दंडासह तुमचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला जाऊ शकतो.
अनेक नागरिकांचे शहरात व गावाकडे असे दोन्हीकडे मतदार यादीत नाव असते. त्यांच्याकडे दोन्ही ठिकाणचे मतदान कार्ड असतात.
त्यामुळे मतदारांनी एकाच ठिकाणी आपले मतदान कायम ठेऊन अन्य ठिकाणी असलेल्या मतदार यादीतून आपले नाव मागे घेण्याची गरज आहे.
मतदारांना आपले नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर (nvsp.in) किंवा मतदार हेल्पलाइन अॅपवर जाऊन तुम्ही फॉर्म ७ भरून आपले नाव वगळू शकता.