Rajanand More
IAS अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल या त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कामामुळे नेहमी चर्चेत असतात. पण यावेळी त्यांच्याबाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेश केडरच्या अधिकारी असलेल्या नागपाल सध्या लखीमपूर खीरीच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांचे पतीही आरएएस अधिकारी आहेत.
दुर्गा शक्ती या 2010 च्या तुकडीच्या अधिकारी असून त्यांनी बेकायदेशीरमध्ये सरकारी बंगल्यात वास्तव्य केल्याने त्यांच्याकडे 1.63 कोटी रुपयांची वसुली लावण्यात आली आहे.
नागपाल यांची 2015 मध्ये दिल्लीत प्रतिनियुक्तीने तत्कालीन कृषी मंत्री राधामोहन यांच्या ओएसडी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांना मंत्रालयाने भारतीय कृषि संशोधन संस्थेचा बंगाल राहण्यासाठी देण्यात आला होता.
2019 मध्ये त्यांची वाणिज्य मंत्रालयात बदली झाली. त्यानंतर त्यांनी बंगल्यात राहण्यासाठी मुदत वाढवून घेतली. पण त्यानंतर संस्थेकडून बंगला रिकामा करण्यासाठी तगादा लावण्यात आला.
नागपाल या बंगला सोडत नसल्याने हे प्रकरण दिल्ली पोलिसांत गेले होते. त्यानंतर नागपाल यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये बंगला सोडला.
संस्थेने आता नागपाल यांना मे 2022 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत बंगल्यासाठीची 1.63 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नागपाल यांनी दंड माफ करण्यासाठी विनंती केल्याची माहिती आहे. त्यांची ही मागणी विचाराधीन असल्याचे त्यांच्याकडूनच सांगितले जात आहे. त्यांनी वडिलांच्या आजारपणाचे कारण दिले आहे.