Rajanand More
बिहारमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिध्द असलेली गायिका मैथिली ठाकूरने आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मागीलवर्षी लोकसभा निवडणुकीत मैथिलीने पहिल्यांदाच मतदान केले होते. त्यानंतर दीड वर्षातच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी तिने केली आहे.
मैथिलीने नुकतीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे समजते.
तावडे यांनी याबाबत सोशल मीडियात माहिती दिली. 1995 मध्ये लालूराजमध्ये बिहार सोडून गेलेले मैथिली ठाकूरच्या कुटुंबाला पुन्हा बिहारमध्ये यायचे आहे. जनता आणि बिहारसाठी त्यांचे योगदानाची अपेक्षित.
राजकीय गाठीभेटींनंतर मैथिलीने मीडियाशी बोलताना आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीसोबतच संगीताची सेवाही सुरू राहील, असे म्हटले.
कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याची दोन दिवसांत घोषणा होणार असल्याचे मैथिलीने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आणि सनातन धर्माला मानणारी असल्याने भाजपकडूनच निवडणूक लढणार.
मैथिलीचा जन्म 25 जुलै 2000 मध्ये बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टीमध्ये झाला आहे. तिचे वडील रमेश ठाकूर हे संगीतकार आहेत.
वयाच्या 13 व्या वर्षीच मैथिलीने नावलौकिक मिळवला. तिची लोकगीते खूप प्रसिध्द आहेत. 2023 मध्ये निवडणूक आयोगाकडून बिहारसाठी स्टेट आयकॉन म्हणून जबाबदारी सांभाळली.