सरकारनामा ब्यूरो
रेशनकार्डची केवायसी करण्यासाठी दुकानात जाण्याची आवश्यकता नाही. आता घरबसल्या मोबाईलद्वारे ‘केवायसी’ करता येणार आहे. जाणून घेऊयात
यासाठी सरकारने ‘मेरा केवायसी ॲप’ (Mera Kyc App)ची निर्मिती केली असून हे ॲप लाभधारकांसाठी कार्यरत केलं आहे.
या ॲपद्वारे लाभार्थी धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वत:ची आणि सहकुटुंबाची ‘ई-केवायसी’ पूर्ण करू शकणार आहे.
सर्व रेशनधारकांना घरबसल्या सोप्या पद्धतीने लाभ मिळावा. यामध्ये फेस ऑथेंटिकेशन या तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी होणार.
रेशन दुकानदारासह, इतर लाभार्थी ई-केवायसी करू शकणार आहेत.
‘ई-केवायसी’साठी महत्वाचे दस्ताऐवज म्हणजे आधार कार्ड असणार आहे. हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेली असणे आवश्यक आहे.
याकरिता https://play.google.com/store/apps/details0id=com.nic.facialauth या लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करायचं आहे.
https://play.google.com/store/apps/details0id=in.gov.uidai.facerd या लिंकवरून आधार फेस ॲप डाउनलोड करुन घ्यायचे आहे. ही वैयक्तिक माहिती भरुन ई-केवायसी करता येणार आहे.
ही सेवा केवळ महाराष्ट्रातील रेशनकार्ड (शिधापत्रिका) लाभार्थींसाठी असणार असून 31 मार्च ही ‘ई-केवायसी’ करण्याची अंतिम तारीख आहे.