Jagdish Patil
1967 - कोयनानगर परिसराला भूकंपाचा धक्का. 250 लोकांचा मृत्यू. मोठ्या प्रमाणात वित्तहानी.
1998 - "ए मेरे वतन के लोगो' यांसारख्या प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणाऱ्या देशभक्तिपर रचनांमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन.
11 December 2001 - संस्कृत, नाट्यशास्त्र आणि संगीतशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश हरी तारळेकर यांचे निधन.
11 December 2002 - ज्येष्ठ विधिज्ञ, घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि लोकप्रिय वक्ते नानी आर्देशीर पालखीवाला यांचे निधन.
11 December 2004 - कर्नाटक शैलीतील प्रख्यात गायिका आणि "मॅगसेसे' पुरस्कारविजेत्या, "भारतरत्न' एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे निधन.
11 December 2013 - हवाई दलाच्या स्वनातीत काळाचे शिलेदार ठरलेले "मिग 21' विमान निवृत्त झाले. या विमानाने 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
2014 - संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं जाहीर केले. PM नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांतील आपल्या पहिल्या भाषणात योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
11 December 2015 - भारताने जी-सॅट 15 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. फ्रेंच गयाना येथील कौराऊ अवकाश स्थानकावरून जी-सॅट 15 सोबत सौदी अरेबियाचा "अरबसॅट-6 बी' चेही प्रक्षेपण झाले.