Jagdish Patil
माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांचे 10 डिसेंबर रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं.
त्यांचे पूर्ण नाव सोमनहल्ली मैल्लया कृष्णा असे होते. 2023 साली त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल अशी अनेक पदं भुषवली.
त्यांचा राजकीय प्रवास 1960 च्या दशकात सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून मद्दूर विधानसभेची जागा जिंकली.
त्यानंतर ते प्रजा सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर जिंकले आणि 1968 नंतर ते मंड्या मतदारसंघातून दोनदा खासदार झाले.
KPCC चे अध्यक्ष म्हणून 1999 मध्ये त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले.
मार्च 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
डिसेंबर 2004 ते मार्च 2008 पर्यंत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रिपदही भूषवले होते.
जानेवारी 2023 मध्ये एसएम कृष्णा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.