Mangesh Mahale
उद्योग सुरू करण्यासाठी व चालविण्यासाठी प्रक्रिया, वेळ, खर्च आणि आवश्यक किमान भांडवल किती लागते, या गोष्टी तपासल्या जातात.
गोदामे किंवा अशा बांधकामांसाठी लागणारा वेळ, खर्च, परवानग्या-परवाने या प्रक्रियेतील सुलभता
नव्याने बांधलेल्या गोदामे व कायमस्वरूपी वीजजोड घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, वेळ आणि खर्च यातील सुलभता
जमीन किंवा मालमत्ता विकत घेण्यासाठी नोंदणीसाठी प्रक्रिया, वेळ आणि खर्च यामध्ये किती गुंतागुंत आहे, हे पाहिले जाते.
वित्तपुरवठ्याची यंत्रणा किती सक्षम आहे आणि दिवाळखोरी कायदा-अन्य कायदे किती परिणामकारक आहेत, हे मुद्देही पाहिले जातात.
अल्पसंख्य भागधारकांचे संरक्षण आणि कंपनीतील पारदर्शकतेच्या अटी यांचे मोजमाप किती होते, हे पाहणे.
मालाच्या आयात-निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रियेशी संबंधित वेळ व खर्चाची नोंद यामध्ये करण्यात येते.
वादांचे स्थानिक न्यायालयांमध्ये कशा पद्धतीने निराकरण होते, त्याचा वेळ व खर्च यांचे मूल्यांकन केले जाते.
दिवाळखोरीच्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि त्यातील निकाल यांविषयीचा अभ्यास करणे