सरकारनामा ब्यूरो
निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पेन्शन योजनेसाठी काही लाभ देण्यात येणार आहेत.
या पेन्शन योजनेसाठी श्रम कार्ड तयार करण्यात आले आहे.
ई-श्रम कार्डद्वारे लहान व्यवसाय, मजूर, मच्छीमार मदतनीस, वाहन चालक आणि पशुपालक यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अर्थिक मदत मिळणार आहे. यांना यात विमा संरक्षणासह दरमहा पेन्शनची सुविधा दिली जाते.
मजुराला वयाच्या ६० वर्षांनंतर ३ हजार रुपये इतकी पेन्शन दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई-श्रम योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.
लाभार्थी घरबसल्या ऑनलाइन ई-श्रम कार्ड घरी बनवू शकणार आहे. यात पेन्शन व्यतिरिक्त अनेक सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.
कोणताही भारतीय कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकणार आहे. यात लाभार्थीचे आधार कार्ड त्याच्या मोबाइल नंबरशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी ई-श्रम पोर्टलवर (https://eshram.gov.in/). जाऊन अर्ज करु शकतात. होम पेजवर जात EShram या पर्यायावर क्लिक करुन नोंदणी होईल.
नवीन खाते उघडल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करुन येणारा कॅप्चार कोड टाकण्याचा आहे.यानंतर EPFO आणि ESIC च्या सक्रिय सदस्यांच्या माहितीसाठी होय/नाही असं उत्तर देत OTP च्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
विचारलेली वैयक्तीक माहिती भरुन व्यवसायाचा प्रकार निवडायचा आहे. यानंतर बँकेची माहिती द्यावी. स्वयं-घोषणा हा पर्याय निवडून SUBMIT पर्यायावर क्लिक करायचे आहे.
मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून एंटर करायचे आणि VERIFY बटणावर क्लिक करुन ई-श्रम कार्ड तयार होते. लाभार्थी हे कार्ड डाऊनलोड करु शकणार आहे.