सरकारनामा ब्यूरो
1 फेब्रुवारी 2025चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.
2025 चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सादर करणार असून, निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असणार आहे.
अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत असतात पण काही कारणाने पंतप्रधानांनी देखील अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यावेळी टी. टी. कृष्णमाचारी हे अर्थमंत्री होते. चलन घोटाळ्यामुळे त्यांना अर्थमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता यामुळे 1958 चा अर्थसंकल्प पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सादर केला होता.
1969 पर्यंत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मोरारजी देसाई अर्थमंत्री होते. तेव्हा त्यांनी अर्थसंकल्प सादर केले होते. पुढे त्यांनी 1977 ला भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
अर्थसंकल्प सादर करणाऱ्या इंदिरा गांधी या पहिल्या महिला होत्या. विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणून देखील त्यांनी 1970 ला अर्थसंकल्प सादर केला.
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी 1987 साली अर्थसंकल्प सादर केला होता.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1991 ते 1996 या कालावधीत अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता. 2003 मध्ये मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.