Reliance Group : बँक फसवणूक प्रकरण; अंबानींच्या मालमत्ता जप्तीचा आकडा 19,344 कोटींच्या पार...

Pradeep Pendhare

सुरवातीची कारवाई

बँक फसवणूक प्रकरणात ईडीनं रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची 3034 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे.

Reliance Group | Sarkarnama

कारवाईतील आकडा

या ताज्या कारवाईत, आतापर्यंत रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची (RAAG) एकूण मालमत्तेचा जप्तीचा आकडा 19344 कोटी रुपयांच्या पार गेला आहे.

Reliance Group | Sarkarnama

कायद्यानुसार कारवाई

ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (PMLA), 2002च्या कलम 5 अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात ही जप्तीची कारवाई केली आहे.

Reliance Group | Sarkarnama

स्थावर मालमत्ता

मुंबईतील उषा किरण बिल्डिंग, एक लक्झरी फ्लॅट, खंडाळा (पुणे) इथला फार्महाऊस आणि साणंद, अहमदाबाद इथल्या जमिनीचा मोठा भागाचा जप्तीत समावेश आहे.

Reliance Group | Sarkarnama

शेअर्स जप्ती

'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'चे 7.71 कोटी शेअर्स जप्तीत समाविष्ट आहेत. हे शेअर्स 'राइजई इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड'कडे होते.

Reliance Group | Sarkarnama

बँकांची तक्रार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि भारतीय जीवन विमा निगम (LIC) यांच्या तक्रारींच्या आधारे ईडीची चौकशी सुरू आहे.

Reliance Group | Sarkarnama

मोठी थकबाकी

RCOM आणि समूहाच्या इतर कंपन्यांनी देशांतर्गत आणि परदेशी बँकांकडून मोठं कर्ज घेतले होतं. सध्या त्यांच्यावर एकूण 40,185 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Reliance Group | Sarkarnama

ईडीचा आरोप

या मालमत्तेचा वापर, ज्या बँकांचा पैसा बुडालाय त्यांचं कर्ज फेडण्यासाठी नाही, तर अनिल अंबानींच्या कुटुंबाला स्वतःच्या फायद्यासाठी करायचा होता.

Reliance Group | Sarkarnama

मालमत्तेचं काय होणार

पीएमएलएच्या कलम 8 अंतर्गत, संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतर जप्त केलेली मालमत्ता, त्या वैध दावेदारांना परत केली जाईल ज्यांचं नुकसान झालं आहे.

Reliance Group | Sarkarnama

NEXT : मराठी शिकवण्यासाठी 100 दिवसांची सवलत...

येथे क्लिक करा :