Pradeep Pendhare
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं सक्ती करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादंग सुरू होता.
मुंबईसह राज्यातील रिक्षाचालकांसाठी 1 मे रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला.
आता 1 मे रोजी ते 15 ऑगस्ट, या 100 दिवसांच्या कालावधीत रिक्षा अन् टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली गेली आहे.
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 2020 साठी एक पुस्तिका देखील काढली होती.
मराठी भाषा शिकायची तयारी असलेल्यांना आरटीओ कार्यालयात जागा तयार करण्यात आली आहे.
1 मे रोजी ते 15 ऑगस्ट दरम्यान, आरटीओचे अधिकारी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकवतील.
आरटीओ अधिकारी मराठी भाषा शिकवतील. पण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, तर मराठी अनिवार्य असणार आहे.
राज्यात ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रिक्षा किंवा टॅक्सी चालत असतील, तर त्यांचे परवाना रद्दची कारवाई सुरू राहणार आहे.
कितीही दबाव टाकला, कितीही बंदचे हत्यार उपसले, तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असला, तर मराठी शिकावीच लागेल, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.