Sunil Balasaheb Dhumal
कविता यांच्यावर भाजपने प्रथम 2022 मध्ये, नवी दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला.
या प्रकरणी त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.
कविता यांनी मात्र दारू घोटाळ्याबाबत तिच्यावरील सर्व आरोप ठामपणे फेटाळले आहेत.
आता त्यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडीने अटक केली आहे.
के. कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.
तेलंगणा राज्य निर्मितीच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
2014 मध्ये राज्याच्या स्थापनेनंतर कविता निवडणुकीच्या राजकारणात उतरल्या.
निजामाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. 2019 मध्ये कविता यांचा भाजपकडून पराभव झाला.
पराभवानंतर कविता यांची विधान परिषेदवर आमदार म्हणून निवड करण्यात आली.