Roshan More
ईडीचे अधिकारी कपिल राज यांनी अचानाक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
कपिल राज हे 2009 चे IRS अधिकारी आहेत. 'पाॅवर फूल' अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
कपिल राज हे 45 वर्षांचे आहे. सेवानिवृत्तेची वय 60 आहे. त्यामुळे 15 वर्षाची सेवा शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनाम दिल्याने चर्चांना उधान आले आहे.
कपिल राज यांनी ईडीमध्ये आठवर्ष सेवा केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कपिल राज यांनीच अटक केली होती.
दोन मुख्यमंत्र्यांना अटकेसाठी ईडीमध्ये असताना त्यांनी दिल्लीतील दारु घोटाळा, नीरव मोदी, मेहुल चौक्शी यासारखी हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास केला.
कपिल यांन अचानक राजीनामा देण्याचे नेमके कारण समोर आले नाही. मात्र, वैयक्तीक कारणासाठी ते राजीनामा देत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.