Roshan More
ED ने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी छापा मारत काही कागदपत्रांची तपासणी केली.
कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ED कडून दारू घोटाळा प्रकरणात चैतन्य यांना अटक केली.
काय आहे प्रकरण?
भूपेश बघेल हे मुख्यमंत्री असताना मद्य वितरण आणि परवानगी प्रणालीतील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. यामध्ये बघेल यांचा मुलगा चैतन्य याचा समावेश असल्याचा EDचा आरोप आहे.
मद्य वितरणातील घोटाळ्यामुळे सरकारचे 2161 कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते.
ईडीने मार्च महिन्यात देखील चैतन्य बघेल यांच्या घरी छापा मारून चौकशी केली होती.
चैतन्य बघेल याच्या घरी छाप्यामध्ये इतर घोटाळ्यासंदर्भात ईडीने कागदपत्रे जप्त केली.
या कारवाईनंत भूपेश बघेल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अदानी यांची कंपनी विरोधात आज विधानसभेत आवाज उठवणार होतो. मात्र, सरकार, साहेबांनी ईडीला आमच्याकडे अगोदर पाठवले