Pradeep Pendhare
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील धरणातील पाणी साठ्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.Maharashtra Water Crisis
गतवर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा 551.86 टीएमसी होता.
यंदा एल निनोच्या प्रभाव असल्याने पाऊसाची अनियमतेता राहून पुढील वर्षी टंचाईची शक्यता आहे.
या पाणी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली.
एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात 2014 मध्ये 12 टक्के, तर 2015 मध्ये सुमारे 14 टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती.
एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.