Jagdish Patil
ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकले आहेत.
मुंबई आणि दिल्लीतील 35 हून अधिक ठिकाणांवर PMLA कायद्याअंतर्गत ही छापेमारी केली जात आहे.
अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला स्टेट बँकेने फ्रॉड घोषित केले असून सीबीआयने FIR दाखल केल्यानंतर, ईडीने रागा कंपन्यांनी केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची चौकशी सुरू केली आहे.
ईडीला प्राथमिक तपासात बँका, भागधारकांची फसवणूक करून सार्वजनिक पैसे लुबाडण्याचा एक सुनियोजित कटाचे पुरावे मिळाले आहेत.
तसंच 2017 ते 2019 दरम्यान येस बँकेकडून मिळालेल्या 3000 कोटींच्या कर्जात मोठ्या अनियमितता आढळली आहे.
या संदर्भात येस बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या गुन्ह्याचीही चौकशी ईडीकडून सुरू आहे.
क्रेडिट अप्रूवलमध्ये नियमांचा भंग, जुनी कागदपत्रे वापरणे, विश्लेषणाशिवाय निधी मंजूर करणे अशा कंपनीच्या अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
2023 मध्येही अंबानींच्या 800 कोटींच्या अघोषित परदेशातील मालमत्तेप्रकरणी आयकरच्या चौकशीत उघड झालेल्या फेमा उल्लंघनाच्या संदर्भात ED ने चौकशी केली होती.
सध्या ईडीसह इतर संस्थाकडून सुरू असलेली छापेमारी गंभीर स्वरूपाचे असून अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
NEXT : UPSC साठी लाखोंची ऑफर धुडकावली, दोनदा अपयश, तरीही हार न मानणाऱ्या IAS अंबिकाची सक्सेस स्टोरी