Jagdish Patil
UPSC परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी असावी लागते.
पदरी अपयश आलं तरी प्रयत्न न सोडता अभ्यास करणाऱ्यांचेच स्वप्न पूर्ण होतं. असंच काहीसं 2022 साली UPSC क्रॅक करणाऱ्या अंबिका रैना यांच्याबाबतीत घडलं आहे.
अंबिका यांचा जन्म जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे झाला. वडील सैन्यात असल्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. त्यामुळे अंबिका याचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं.
त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या, पालकांनीही त्यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला.
गुजरातमधील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी पूर्ण करण्याआधीच त्यांना स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील एका कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली.
या इंटर्नशिपमुळे त्यांना लाखो रुपयांच्या पगाराच्या नोकरीच्या ऑफरही मिळाल्या, पण त्यांचं स्वप्न वेगळं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या भारतात परतल्या.
अंबिका यांनी भारतात परत येऊन UPSC परिक्षेची तयारी सुरु केली. सुरुवातीला दोन प्रयत्नात त्यांनी अपयश मिळाले. त्यानंतर त्यांनी अभ्यासाची पद्धत बदलली. मॉक टेस्ट दिल्या.
आधीच्या परिक्षांचे पेपर सोडवून आणि टॉपर्सच्या मुलाखती पाहून त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात 164 रँक मिळवत UPSC क्रॅक केली.
सध्या अंबिका IAS अधिकारी म्हणून काम करतात, त्यांचे लग्न आयएएस अमृतेश शुक्ला यांच्याशी झाले आहे.