Aslam Shanedivan
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर ईडीने छापा मारला.
अनिलकुमार पवार यांच्या बदलीच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने कारवाई केली होती. त्यांच्या बदलीचे आदेश 17 (जुलै) तारखेलाच काढण्यात आले होते.
त्यांची बदली मुंबई महानगर प्रदेश गृहनिर्माण प्राधिकरण (MMR SRA), ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली होती.
पण त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तब्बल 11 दिवसानी सोडला होता. त्यांच्या या पदभार सोडण्यातील कालावधीमुळेच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम जंगी झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी वसईतील शासकीय निवासस्थान तसेच नाशिक, पुणे अशा एकूण 12 ठिकाणी ED कडून कारवाई झाली होती
अनिलकुमार पवार यांची जागी मनोजकुमार सूर्यवंशी यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
अनिलकुमार पवार यांच्यावर इमारतींच्या CC देणे, व्यवहार आणि ठेकेदार संबंधित फाइल क्लिअर केल्याचा आरोप केला जात आहे.