Rajanand More
रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे मेव्हणे आहेत.
ईडीने वाड्रा व त्यांच्याशी संबंधित संस्थांची एका मनी लाँर्डिंग प्रकरणात नुकतीच 37.64 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये 43 अचल मालमत्तांचा समावेश आहे.
प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडील संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या नावे त्यावेळी 65.56 कोटींची मालमत्ता होती.
प्रतिज्ञापत्रानुसार, वाड्रा यांच्याकडे 39.91 कोटींची चल आणि 27.64 कोटींची अचल संपत्ती होते. तसेच 10.03 कोटी रुपयांची देणीही होती.
प्रियांका गांधी यांच्याकडे मागीलवर्षीपर्यंत सुमारे 12 कोटींची संपत्ती होती. प्रत्यक्षात वाड्रा कुटुंबाकडे हजार कोटींहून अधिक किंमती संपत्ती असल्याचा दावा काही परदेशी पोर्टल्सकडून केला जातो.
हरियाणातील 2013 मधील एका जमीन व्यवहार प्रकरणात वाड्रा यांची ईडीने चौकशी केली होती. या व्यवहारामध्ये सुमारे 50 कोटींची बेकायदेशीर देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे.
मनी लाँर्न्डिंग प्रकरणी ईडीने वाड्रा यांच्यासह त्यांची स्काय लाईट कंपनी आणि इतर 11 लोक व संस्थांविरोधात 16 जुलै रोजीच आरोपपत्र दाखल केले आहे.
रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या कुटुंबाचा राजकीय हेतूने प्रेरित होत सरकारकडून छळ केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी सोशल मीडियातून केला आहे.