Rajanand More
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील मंगळवारी (ता. 15) पायउतार झाले. आमदार शशिकांत शिंदे हे आता या पदाची धुरा सांभाळतील. पाटील यांच्या कार्यकाळात 7 घडामोडी पक्षासाठी महत्वाच्या ठरल्या.
पाटील यांची एप्रिल 2018 मध्ये या पदावर नियुक्ती झाल्यानंतर वर्षभरातच लोकसभेची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने (एकसंध) लढवलेल्या 19 पैकी 5 जागा जिंकल्या. मोदी लाटेत पक्षाला हे यश मिळाले होते.
या निवडणूक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चमकदार कामगिरी केली. पक्षाला 54 जागा मिळाल्या. यावेळी 13 जागा वाढल्या. पक्षाला 92 लाखांहून अधिक मते मिळाली.
विधानसभेनंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यासाठी जयंत पाटील यांचा पुढाकारही महत्वाचा ठरला. त्यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते.
जुलै 2023 मध्ये पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांच्यासह बहुतेक सर्व मातब्बर नेते एका बाजूला गेले. त्यांना मुळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह मिळाले. पाटील शरद पवारांसोबतच राहिले आणि प्रदेशाध्यक्षपदी कायम राखले.
पक्षफूटीनंतर ही पहिलीच निवडणूक. या निवडणुकीत लढवलेल्या 10 पैकी 8 जागांवर पक्षाला मोठा विजय मिळाला. पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा विजय ठरला होता.
ही निवडणूक पक्षासाठी आणि पाटील यांच्यासाठीही निराशाजनक ठरली. पक्षाचे केवळ 10 उमदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. जयंत पाटील यांचे मताधिक्यही घसरले.
जयंत पाटील यांच्या कार्यकाळात पक्षाचा विदर्भ आणि मराठवाड्यात विस्तार करण्यात फारसे यश मिळाले नाही. पश्चिम महाराष्ट्रच पक्षाचा बालेकिल्ला म्हणून कायम राहिला.