Chetan Zadpe
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने सार्वजनिक जीवनात सर्व कायद्यांचे पालन करीन, अशी शपथ अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून घेतली.
प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने महिला-मातृशक्तिचा कायम आदर करेन, अशी शपथ अजित पवारांनी स्वराज्य सप्ताहाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना घातली.
दरवर्षी एक झाड लावण्याच्या संकल्प करुन लावलेल्या झाडाचे संगोपन करेन, अशीही शपथ यावेळी घेण्यात आली.
आपल्या सभोवताली परिसरातील पर्यावरणाचीही काळजी घेईन, अशीही कार्यकर्त्यांनी शपथ घेतली.
मी स्वत: सर्व व्यसनांपासून दूर राहीन, अशीही शपथ सर्व कार्यकर्त्यांनी घेतलीस गेली.
"व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तिंना व्यसनांपासून दूर करण्याचा मी स्वत:हू प्रयत्न करेन."
मी धर्म - जात - पंथ - लिंग - या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या मूल्याचीही शपथ घेण्यात आली.
सार्वजनिक सद्भाव आणि सलोखा कायम राहावा, या करता कायम प्रयत्न करेन, अशीही शपथ यावेळी घेण्यात आली.