Akshay Sabale
'इंडिया आघाडी'तील लोकप्रिय नेता कोण? याचा एक सर्व्हे समोर आला आहे. यात 21.3 टक्के जनतेनं राहुल गांधी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास योग्य असल्याचं म्हटलं आहे.
दुसऱ्या क्रमांकाला 17.4 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पसंती दर्शवली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 16.5 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
6.4 टक्के लोकांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेतृत्व करण्यास योग्य असल्याचं म्हटलं आहे.
तर, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना 4.2 लोकांनी पसंती दर्शवली आहे.
विरोधी पक्षनेते म्हणून 34.8 टक्के लोकांनी राहुल गांधी यांची कामगिरी खराब असल्याचं म्हटलं आहे.
तर, विरोधी पक्षनेते म्हणून 23 टक्के लोकांनी राहुल गांधींची कामगिरी उत्तम असल्याचं सांगितलं.
तसेच, 'भारत जोडो न्याय यात्रे'मुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारली नसल्याचं 42 टक्के लोकांनी म्हटलं.