Richest Ministers in Modi Govt : मोदी सरकारमधील सर्वांत श्रीमंत आठ मंत्री

Vijaykumar Dudhale

चंद्रशेखर पेम्मासानी

केंद्रीय ग्रामीण विकास आणि दळणवळण राज्य मंत्री चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वाधिक श्रीमंत असून त्यांच्याकडे 5705.47 कोटींची संपत्ती आहे. पेम्मासानी हे तेलगू देसम पक्षाचे खासदार आहेत.

Chandrashekhar Pemmasani | Sarkarnama

ज्योतिरादित्य शिंदे

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे 424. 75 कोटींची संपत्ती आहे. शिंदे हे भाजपकडून गुना मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

Jyotiraditya Shinde | Sarkarnama

एचडी. कुमारस्वामी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एचडी. कुमारस्वामी हे 217. 23 कोटींचे मालक आहेत. ते जेडीएसचे प्रमुख नेते आहेत.

H.D. kumaraswami | Sarkarnama

अश्विनी वैष्णव

रेल्वेमंत्री तथा भाजप नेते अश्विनी वैष्णव यांच्याकडे 144.12 कोटी रुपयांचे मालक आहेत.

ashwini vaishnaw | Sarkarnama

राव इंद्रजित सिंह

भाजपचे राव इंद्रजित सिंह यांच्याकडे 121.54 कोटींची मालमत्ता आहे. राव यांच्याकडे सांख्यिकी, नियोजन आणि संस्कृती विभागाचे राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) आहे.

Rao Inderjeet Singh | Sarkarnama

पियुष गोयल

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे 110. 95 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

piyush goyal | Sarkarnama

अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे 65 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Amit Shah | Sarkarnama

कृष्ण पाल

सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल हे 62 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

Krishan Pal | Sarkarnama

सौंदर्याने घायाळ अन् बुध्दीचातुर्याने अवाक करणाऱ्या या 'ब्युटी विथ ब्रेन' महिला IPS ला पाहिलंत का?

Aashna Chaudhary