सरकारनामा ब्यूरो
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा या ठिकाणी शिवमहापुराण कथे दरम्यान त्यांनी उपस्थिती लावली.
या सोहळ्याला उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी शिवपुराण कथेच्या निरुपणाचा अनुभव शिंदेंनी घेतला.
कार्यक्रमावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधला.
हनुमान गढी येथे हनुमानाच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यासाठी या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एकनाथ शिंदेंनी खासदार नवनीत राणा यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उपस्थित होते.