Roshan More
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आज सहा खासदारांनी प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी त्यांनी सहाही उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर त्यांच्या मतदारसंघात लढतील, अशी घोषणा केली.
शिंदेंनी सहाही उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, सहामधील दोन मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे हे एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. मात्र, या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. येथून अर्चना पाटील या घड्याळ चिन्ह्यावरल लढल्या होत्या.
ईशान्य मुंबई मतदारसंघातील खासदार संजय दिना पाटील हे शिंदेंसोबत गेले आहेत. या मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. मागील वेळी भाजपचा उमेदवार येथून पराभूत झाला होता.
यवतमाळ, परभणी, हिंगोली, शिर्डी हे मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना सामाना झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील खासदार शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट मिळण्यास अडचण येणार नाही.
उद्धव ठाकरे देखील या सर्व सहा ठिकाणी पुन्हा आपले उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट आहे.
खासदार फुटल्याने ठाकरे ह महाविकास आघाडीसोबत राहून पुढील निवडणूक लढतील, अशी शक्यता आहे.