Jagdish Patil
बहुचर्चित नाशिक विधानपरिषद निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागला आहे.
ज्या निवडणुकीसाठी महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी मध्यस्थी केली. त्याच निवडणुकीत युतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव झाला आहे.
तर या निवडणुकीत अखेर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे.
तर नरेंद्र दराडेंना पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारे गोकुळ गीते कोण आहेत ते जाणून घेऊया.
गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीतेंचे बंधू आहेत.
गणेश गीतेंच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ यांचा मोठा हातभार राहिला आहे.
गणेश गीतेंनी यंदाची विधानसभा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीची संपूर्ण धुरा गोकुळ गीते यांनी सांभाळली होती.
तर ते पिंपळगाव बाजार समितीवर दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत.
शिवाय गीते यांनी सायखेडा गटातून ZP ची पूर्वतयारी सुरू होती. आता ते थेट विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत.