Kunal Kamra : शिंदेंच्या आधी, PM मोदींवरही कविता; वादग्रस्त कुणाल कामरा कोण आहे?

Hrishikesh Nalagune

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Kunal Kamra | sarkarnama

एका कॉमेडी शोमध्ये, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं सादर केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.

Kunal Kamra | sarkarnama

शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे.

Kunal Kamra | sarkarnama

कुणाल कामरा याने 2017 पासून युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती.

Kunal Kamra | sarkarnama

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरवील, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानी अशा व्यक्तींच्या मुलाखती त्याने घेतल्या होत्या.

Kunal Kamra | sarkarnama

त्यानंतर त्याने 'शटअप कुणाल' हा कॉमेडी शो सुरु केला होता. या शोमुळेच त्याला सर्वात जास्त प्रसिद्ध मिळाली होती.

Kunal Kamra | sarkarnama

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केल्यामुळेही कुणाल कामरा वादात सापडला होता.

Kunal Kamra | sarkarnama

2020 मध्ये एकाच फ्लाईटमधून प्रवास करताना पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याबरोबरही कुणाल कामराचा वाद झाल होता.

Kunal Kamra | sarkarnama

त्यानंतर इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईसजेटने कुणाल कामराच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती.

Kunal Kamra | sarkarnama

कुणाल कामराच्या युट्यूब चॅनेलचे 2.31 मिलियन सबस्क्राईबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर त्याचे एक मिलिअन फॉलोवर्स आहेत.

Kunal Kamra | sarkarnama

केरळ भाजप अध्यक्षपदावर लागणार राजीव चंद्रशेखर यांची वर्णी!

Rajeev Chandrasekhar | sarkarnama
येथे क्लिक करा