Mayur Ratnaparkhe
माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांना केरळमध्ये भाजपचे नवे अध्यक्ष केले जाऊ शकते.
राजीव चंद्रशेखर यांनी तिरुअनंतपुरममध्ये केरळ भाजप अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
राजीव चंद्रशेखर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला असल्याची माहिती आहे.
राजीव चंद्रशेखर यांना दोन दशकांहून अधिक राजकीय अनुभव आहे.
विकासाच्या अजेंड्यावर काम करणारा एक खंबीर नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.
राजीव चंद्रशेखर यांचा जन्म 31 मे 1964 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला.
राजीव चंद्रशेखर यांनी शिकागो येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले आहे.
राजीव चंद्रशेखर यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक तिरुअनंतपुरममधून लढवली होती.