Sunil Balasaheb Dhumal
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नीती आयोगाच्या बैठकीत २०४७ ला विकसीत राष्ट्रासाठी महाराष्ट्र करत असलेल्या योजनांची माहिती दिली.
यावेळी त्यांनी राज्यासाठी केंद्राकडे काही मोठ्या मागण्या केल्या. दूध, कांदा, सोयाबीन याबाबत प्रश्न मांडले.
मराठवाडा दुष्काळमुक्त अन् नदीजोड प्रकल्पांना मदत करण्याचे आवाहन केले.
कोकण ते गोदावरी खोरे, तापी खोरे, वैनगंगा-नळगंगा, तापी महाकाय पुनर्भरण अशा नदीजोड योजना राबवण्यात येणार आहेत.
उद्योजकांना सवलती देण्यासंदर्भात चर्चा केली.
अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्गामुळं वाहतूक सुकर झाल्याची माहिती दिली.
लाडक्या बहीण योजनेच्या आड येणाऱ्या विरोधकांना सावत्र भाऊ असा टोला शिंदेंनी लगावला.