सरकारनामा ब्यूरो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या आठवड्यात दिल्लीला जाणार आहेत.
येत्या आठवड्यात दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपप्रणित एनडीएची अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारमधील हे तीनही प्रमुख नेते दिल्लीला जाणार आहेत.
येत्या आठवड्यात दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी म्हटले.
महाराष्ट्रासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. कारण सत्ताधारी पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप कसं होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रात युतीमध्ये फक्त दोन मोठे पक्ष होते. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटही सहभागी झाल्याने महायुतीच्या जागावाटपाची उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा मिळतात? याकडे लक्ष आहे.