Roshan More
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला.
राज ठाकरे म्हणाले, आमच्यातील भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे.महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चूक नाही.
राज यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमाला उत्तर दिले ते म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी मी सोबत जायला तयार आहे. राज्यासाठी भांडणं बाजुला ठेवायला तयार आहे.
राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर एका पत्रकाराने एकनाथ शिंदेंना विचारले असता ते म्हणाले, काही तरी कामाचा विचारा.
राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर आनंदच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मनसेचे नेतृत्व राज ठाकरेसाहेब करतात त्यामुळे त्यांनी कोणासोबत जावे यावर मी बोलणे योग्य नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
युती म्हणजे फक्त निवडणुकीपुरती असे नाही. मराठीच्या मुद्यावर मराठी पक्ष एकत्र आले तर काय हरकत आहे. तामिळनाडूमधील पक्ष पाणीप्रश्नावर एकत्र येतात,असे संदीप देशपांडे म्हणाले.
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यामध्ये फार वादविवाद करण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले.