Ganesh Sonawane
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये अस्खलित इंग्रजीत केलेल्या भाषणाची सध्या चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
त्यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यातीलच मंगला हायस्कूल येथे झाले. येथून त्यांनी अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण त्यांच्याकडे शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती.
त्यांनी पुन्हा आणखी शिक्षण घेण्याचं ठरवलं अन् यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून 2020 मध्ये त्यांनी B.A. पदवी पूर्ण केली.
शिंदेंनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि 77.25 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
B.A झाल्यानंतर शिंदे तिथेच थांबले नाही तर त्यांनी त्यानंतर M.A. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला चांगले शिकवले आणि डॉक्टर केले.