ब्रिटिश संसदेत 'लाडकी बहीण'चा डंका! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंना पुरस्कार, पाहा PHOTOS

Jagdish Patil

लंडन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लंडन दौऱ्यावर असून, ब्रिटिश संसदेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

पुरस्कार

‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये एकनाथ शिंदेंच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मानाचे 2 पुरस्कार दिले गेले.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

लीडरशिप

‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या पुरस्काराने एकनाथ शिंदेंचा गौरव करण्यात आला.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

यूके बिझनेस कौन्सिल

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

दखल

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राबविलेल्या नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

योजना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

दखल

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, नागरिकांना थेट शासकीय सेवा आणि तरुणांना रोजगाराचा प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या योजनांची दखल घेण्यात आली.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

गजर

तर हा पुरस्कार मला प्रदान होताच सभागृहात 'जय हिंद, जय महाराष्ट्र'चा गजर झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

मान्यवर

या सोहळ्याला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Eknath Shinde London Visit | Sarkarnama

NEXT : MPSC विद्यार्थी ज्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक ते विवेक भीमनवार नक्की कोण? सगळी हिस्ट्री एका क्लिकवर

MPSC Chairman Vivek Bhimanwar
क्लिक करा