Chetan Zadpe
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांची पाहणी करून मुख्यमंत्री शिंदेंनी सूचना केल्या.
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वरळीतील गणपतराव कदम मार्ग, वरळी आट्रीया मॉल समोरील एम के संघी मार्ग आणि दादरच्या शिवसेना भवन समोरील दादासाहेब रेगे मार्गावरील रस्ते काँक्रीटीकरण कामाची पाहणी मुख्यत्र्यांनी पाहणी केली.
कामाचा दर्जा उत्तम राखून ते विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
वरळीतील रस्त्यांची कामे कसे चालू आहे. या कामांना आणखी किती अवधी लागणार, याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु , अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांशी-नागरिकांशीही संवाद साधला.
लोकसभेनंतर मुंबई पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शिंदे मुंबईत सक्रिय झाले आहेत.