Rambhau Mhalgi Death Anniversary : भाजपच्या आदरस्थानी असलेले रामभाऊ म्हाळगी कोण होते?

Chetan Zadpe

संघाचे प्रचारक -

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

संघटनेसाठी प्रवास -

1952 -53 च्या सुमारास रामभाऊ राजकारणात आले. सुरुवातीला भारतीय जनसंघ अर्थात आताच्या भाजपच्या संघटनाची जबाबदारी त्यांनी यथायोग्य पार पाडली. संघटना बांधणीसाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला.

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

जन्म -

रामभाऊंचा जन्म पुणे जिल्ह्यातील कुडूस गावी झाला. प्राथमिक शिक्षण कुडूसमध्ये, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. विद्यार्थिदशेतच संघाच्या संपर्कात आले. मद्रास व सोलापूर येथे त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले.

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

महाराष्ट्रातून पहिले आमदार -

जनसंघाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेतले ते पहिलेच आमदार होते. आपल्या कार्याच्या बळावर ते जनसंघचे प्रदेशाध्यक्षदेखील बनले. त्यांची जडणघडणच संघाच्या मुशीत झाली.

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

सर्वांगीण नेतृत्व -

यासोबतच ते मध्य रेल्वे स्टेशन मास्टर्स संघटनेचे उपाध्यक्ष आणि पुणे बार काउन्सिलचे उपाध्यक्षदेखील होते. रामभाऊ म्हाळगी यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनसंघ महाराष्ट्रात वाढवण्याचे काम केले.

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

प्रभावी वक्तृत्वशैली -

जनसंघाचे चारच आमदार होते तरीदेखील अभ्यासपूर्ण भाषणामुळे रामभाऊंचा विधानसभेत मोठा दबदबा होता. ते बोलायला लागले की सर्व सभागृह शांत असायचे, त्यांच्या भाषणात कधीही गोंधळ होत नव्हता.

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

आमदार - खासदार -

1957, 1967 आणि 1972 असे तीन वेळा भारतीय जनसंघाकडून विधानसभेत आमदार तर 1977 व 1980 असे दोन वेळा ठाणे मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले.

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

निधन -

6 मार्च 1982 रोजी वयाच्या साठाव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.

R

Rambhau Mhalgi Death Anniversary | Sarkarnamam

NEXT : बाळासाहेब थोरातांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; जयश्री थोरात यांना काँग्रेसने दिली नवी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा...