Jagdish Patil
MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे सध्या आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणावरून पुण्यात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आयोगाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह विरोधक ज्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत ते विवेक भीमनवार कोण आहेत? ते जाणून घेऊया.
विवेक भीमनवार हे महाराष्ट्र कॅडरचे २००९ बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत.
मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या भीमनवार यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी एम.एससी. आणि एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
MPSC अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये परिवहन आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं.
भीमनवार यांनी फेब्रुवारी २०२६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली.
प्रश्नपत्रिका फुटीवर बोलताना भीमनवार यांनी “माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर मी क्षणभरही या पदावर राहणार नाही,” असं म्हटलंय.
त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यी राजीनाम्याची मागणी करत असताना, भीमनवार यांनी मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे.