Roshan More
यंदाच्या वर्षात देशासह महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. तर कसब्यातील काँग्रेसचा विजय झाला. शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांना ‘शिवसेना’ हे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला.
भाजप खासदार गिरीश बापट यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी विधानसभेत पाच वेळा कसबा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हटला जातो. गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजप उमेदवाराला पराभूत करून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र, पवारांनी राजीनामा देऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळानंतर राजीनामा परत घेत असल्याची घोषणा केली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद मिळाले.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या पोटनिवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून विजयी झाल्या.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील हा नवाचेहरा मिळाला. जरांगेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा करिष्मा पुन्हा एकदा चालला. या राज्यात भाजप बहुमताने विजयी झाले.
जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेत नितीशकुमार यांनी सर्वांना चकीत केले. बिहारमध्ये त्यांनी जातनिहाय जनगणना करत त्याची आकडेवारी जाहीर केली.