Controversial statement 2023 : सरत्या 2023 वर्षातील 'ती' दहा वादग्रस्त विधाने, ज्यामुळे राजकारण पेटले!

Chetan Zadpe

उदयनिधी स्टॅलिन -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे मुलगे राज्य सराकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सनातन धर्माची तुलना त्यांनी डेंगी-मलेरियाशी केली होती.

Controversial statement 2023 | Sarkarnama

धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) -

ज्या महिलेने सिंदूर लावले नसेल आणि मंगळसूत्र घातले नसेल तर तो समजा तो प्लॉट खाली आहे, अशा पद्धतीचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.

Controversial statement 2023 | Sarkarnama

मनोज जरांगे पाटील -

'आम्ही हुशार असतानाही ज्यांची लायकी नाही, अशा लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे वक्तव्य केल्याने, मनोज जरांगे यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. यानंतर त्यांनी ते वाक्य मागे घेतले.

Controversial statement 2023 | Sarkarnama

उद्धव ठाकरे -

एका पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी फडतूस गृहमंत्री असा केला. यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते.

Controversial statement 2023 | Sarkarnama

चंद्रकांत पाटील -

शाळा सुरू करण्यासाठी फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी भीक मागितली, असे वादग्रस्त विधान राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यामुळे त्यांच्यावर शाईफेक हल्ला झाला होता.

Controversial statement 2023 | Sarkarnama

संजय राऊत -

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्य विधीमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला. यामुळे राज्यात जोरदार राजकारण तापले होते.

Controversial statement 2023 | Sarkarnama

संभाजी भिडे -

शिव हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांचे वडिल मुस्लिम होते, असे वादग्रस्त विधान केले होते.

Controversial statement 2023 | Sarkarnama

राहुल गांधी -

पंतप्रधान मोदी म्हणजे पनौती मोदी आहेत. ते क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना पाहायला गेले आणि भारतीय संघ हरला, असे वादग्रस्त विधान गांधींनी केले होते.

Controversial statement 2023 | Sarkarnama

दयानिधी मारण -

तामिळनाडूतील खासदार दयानिधी मारण यांनी नुकतेच, 'यू. पी. बिहारसारख्या हिंदी पट्ट्यातील लोक' आमच्याकडे शौचालय सफाईचे काम करायला येतात, असे वादग्रस्त विधान केले होते.

Controversial statement 2023 | Sarkarnama

NEXT : राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट; पाहा खास फोटो!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा...