Rajanand More
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
प्रत्येकात वेगवेगळे गुण आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी कुणीही आलेले नाही. मतदारसंघातील लोकांना न्याय देण्यासाठी, विकासासाठी हे सर्व शिवसेनेत आले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. या खासदारांविषयी काय म्हणाले शिंदे?
संजय जाधव हे ग्रास रूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांना प्रेमाने बॉस म्हणतात. जमिनीशी घट्ट नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा खासदार आहे.
संजय पाटील हे बिनधास्त आणि बेधडक आहेत. दोस्ती, यारीसाठी उत्तम आहेत. संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे.
ओमराजे हे तर मनाचे राजे आहेत. त्यांनी मनात निश्चय केला आणि इकडे आले. ते रिअल स्टार आहे.
संजय देशमुखांचे काम उत्तम आहे. त्यांना अधिक उत्तम काम करण्यासाठी शिवसेनेत आले आहेत.
नागेश पाटील आष्टीकर हे ओपनिंग बॅट्समन आहेत. ते कुणाच्या वाटेला जात नाही. पण वाटेला जाल तर त्यांचे नाव नागेश आहे.
नावात वाघ आहे आणि भाऊही आहे. भाऊ आपला लाडकी बहीण योजना राबविणाऱ्यासोबत यायलाच पाहिजे.