सरकारनामा ब्यूरो
एसीपी मंजिता वंजारा यांचा जन्म शासकीय अधिकारी असलेल्या परिवारात झाला.
शालेय शिक्षण पूर्ण करून शासकीय क्षेत्र न निवडता मंजिताने निरमा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
मंजिताने फॅशन डिझायनिंगच्या 'एनआयएफटी' येथे नोंदणी केली आणि नामांकित फॅशन ब्रँडमध्ये काम केले आहे.
पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मंजिताने यूपीएससीचा अभ्यास केला आणि 2011 मध्ये त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली.
मंजिता या बुरखा घालून जुगाराच्या अड्ड्यातील २८ जुगारांना रंगेहाथ पकडणाऱ्या यशस्वी महिला एसीपी आहेत.
मंजिता कुचीपुडी आणि भरतनाट्यम नृत्य करतात.
गुन्हेगारांविरोधात सामना करण्याच्या खास शैलीमुळे त्यांनी अनेक गुन्ह्यांवर यशस्विपणे छापे टाकले आहेत.