Eknath Shinde News: सीएम शिंदेंची 'वांद्रे वंडरलॅन्ड'ला हजेरी, गिफ्ट वाटून साजरा केला ख्रिसमस

सरकारनामा ब्यूरो

मुंबई वांद्रे विभाग

मुंबईतील वांद्रे विभागातील कार्टर रोड येथील ॲम्फी थिएटर येथे नाताळच्या सणानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Eknath Shinde | Sarkarnama

नाताळनिमित्त कार्यक्रम

युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी वांद्रे पूर्व येथे नाताळनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.

Eknath Shinde | Sarkarnama

नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा

महोत्सवाला एकनाथ शिंदेंनी उपस्थित राहून नागरिकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.

Eknath Shinde | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी दिले गिफ्ट्स

मुख्यमंत्र्यांनी नाताळ निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधत सगळ्यांना भेटवस्तू दिल्या.

Eknath Shinde | Sarkarnama

'वांद्रे वंडरलॅन्ड'

गेल्या दहा वर्षांपासून वांद्रे कार्टर रोड येथे 'वांद्रे वंडरलॅन्ड' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

आकर्षक विद्युत रोषणाई

'वांद्रे वंडरलॅन्ड' या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरात सगळीकडे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.

Eknath Shinde | Sarkarnama

नाताळ सण

दसरा, दिवाळी, दहिहंडी प्रमाणे नाताळचा सणही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत असल्याबद्दल एकनाथ शिंदेंनी समाधान व्यक्त केले.

Eknath Shinde | Sarkarnama

कोरोनाला घाबरु नये

यंदा नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करताना कोरोनाचे सावट असले, तरीही घाबरण्याऐवजी काळजी घेण्याची गरज असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले.

Eknath Shinde | Sarkarnama

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते

यावेळी युवासेनेचे राहुल कनाल, माजी नगरसेवक वीरेंद्र म्हात्रे आणि शिवसेनेचे पश्चिम उपनगरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde | Sarkarnama

Next : संघासमोर वाजपेयींनी केली होती कानउघाडणी

येथे क्लिक करा