Ganesh Sonawane
महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे.
निवडणुक आली की एबी फॉर्मची चांगलीच चर्चा असते. पण हा एबी फॉर्म म्हणजे नेमकं काय? हे समजून घेऊ
निवडणूक प्रक्रियेत'एबी फॉर्म'ला खूप महत्त्व असून यामुळेच संबंधित उमेदवार हा 'एबी फॉर्म' देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो. त्याला पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं.
एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.
ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
'बी फॉर्म' हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.
'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.