Rashmi Mane
प्रियांका गांधी यांच्या कुटुंबात लवकरचं सनई- चौघडे वाजणार आहेत. त्यांचा मुलगा रेहान वाड्रा याच्या आयुष्यात खास व्यक्तीने प्रवेश केला असून त्याच्या भावी पत्नीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तिच्या ग्लॅमरस आणि साध्या व्यक्तिमत्त्वामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
रेहान वाड्रा आणि त्याची होणारी पत्नी अवीवा बेग यांची साखरपुडा पार पडणार अशा चर्चा आहेत. हा कार्यक्रम अत्यंत खासगी ठेवण्यात आला आहे.
अवीवा बेग या दिल्लीच्या आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्येच झाला असून अवीवाने नवी दिल्लीतील प्रसिद्ध मॉडर्न स्कूल, बाराखंबा रोड येथून शिक्षण पूर्ण केले.
पुढे ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून जर्नलिझम आणि कम्युनिकेशनची पदवी मिळवली.
अवीवा एक प्रतिभावान फोटोग्राफर म्हणून ओळखली जाते. तिचे काम देश-विदेशातील अनेक प्रदर्शनांमध्ये त्यांचे काम सादर झाले आहे.
अवीवा ‘Atelier 11’ या फोटोग्राफिक स्टुडिओची सह-संस्थापक आहे. भारतभरातील नामांकित ब्रँड्स, एजन्सीज आणि डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट्ससाठी ती काम करते.
फोटोग्राफीसोबतच अवीवा राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळलेली आहे.