Election Campaign: दर ठरले! आता त्यापद्धतीनेच बिलं सादर करा, निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिली नियमावली

सरकारनामा ब्यूरो

निवडणूक आयोगाकडून नियमावली

राजकीय पक्षांकडून निवडणुकांवर होणाऱ्या अमर्याद खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नियमावली दिली जाते. 

Election Campaign | Sarkarnama

उमेदवाराची खर्च मर्यादा

लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या प्रत्येक उमेदवाराला गेल्या निवडणुकीत ही खर्च मर्यादा 70 लाख होती. मात्र, आता ती 95 लाखांवर केली आहे. 

Election Campaign | Sarkarnama

खाद्यपदार्थांचे दर

कॉफी 15, आईस्क्रिम लहान कप 20, मोठा कप 40, शीतपेय 20, पॅटिस 20, लाडू चिवडा पाकीट 40, पोहे 20, डोसा-उत्तप्पा 50, मिसळ-60, साबुदाणा खिचडी-वडा प्लेट 25 रुपये निश्चित करण्यात आले.

Election Campaign | Sarkarnama

वाहतुकीचे दर :

रिक्षा, जीप, ट्रॅक्स, बोलेरो, टाटा सुमो, तवेरा 3900 ते 4290 , टाटा विक्टा, इंडिका, इंडिगो, फोर्ड आयकॉन, स्विफ्ट यांचेही दर ठरवण्यात आले.

Election Campaign | Sarkarnama

मंडप दर

मंडप फर्निचर वीज साहित्यासह व्यासपीठ प्रतिचौरस फूट 25, मंडप प्रतिचौरस फूट 15, बॅरिकेट्स 50, नेट 45, स्वागत गेट मोठा 20 हजार, छोटे पाच हजार करण्यात आले आहे.

Election Campaign | Sarkarnama

तांत्रिक दर

ट्यूबलाइट प्रतिनग 50 रुपये, हॅलोजन 160 , पंखा 150, कूलर दीड हजार रुपये, जम्बो पंखा 400 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

Election Campaign | Sarkarnama

अन्य दर

प्रतिखुर्ची दहा रुपये, कुशन खुर्ची 25 रुपये, फिरती खुर्ची 250 रुपये, मॅट्रेस बेडशीड आणि लोड 100, टेबल 30 रुपये, कापडी कमान प्रतिचौरस फूट दीडशे रुपये केले आहेत.

Election Campaign | Sarkarnama

यांचाही समावेश

छायाचित्र, ऑडिओ-व्हिडिओ क्लिपचे दरही या वेळी निश्चित करण्यात आले आहेत.

R

Election Campaign | Sarkarnama

Next : कंगना रनौतबद्दल 'या युनिक' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

येथे क्लिक करा