Rajanand More
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. करुणानिधी व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रिपदी बढती झाली आहे.
करुणानिधी आणि स्टॅलिन यांच्यानंतर उदयनिधी हे तिसऱ्या पिढीतील नेते आहेत, ज्यांना सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी मिळाली आहे.
उदयनिधी यांनी चित्रपटातून करिअरला सुरूवात केली होती. आधी निर्माता आणि नंतर अभिनेते म्हणून त्यांनी मोठा पदडा गाजवला. पण 2023 मध्ये चित्रपटांकडे पाठ फिरवली.
चित्रपटातून राजकारणात येत उच्च पदापर्यंत पोहचण्याची दक्षिणेतील अभिनेत्यांची परंपरा उदयनिधी यांच्यारुपाने कायम राहिली आहे.
डीएमकेच्या युथ विंगचे ते अध्यक्ष असून सध्या पूर्णवेळ राजकारणात सक्रीय झाले आहेत. उपमुख्यमंत्रिपद मिळण्याआधी त्यांच्याकडे युवक कल्याण व क्रीडा खातेही होते.
उदयनिधी यांच्याकडे तमिळनाडूचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. राज्यात 2026 मध्ये विधानसभेची निवडणूक असून त्याआधीच त्यांना बढती मिळाल्याने चर्चांना उधाण.
2021 ची विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनिधी यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यांनीच पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेली विधाने वादग्रस्त ठरली आहेत. त्यावरून त्यांना रोषालाही सामोरे जावे लागले आहे.