Ganesh Sonawane
नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मदतानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
तसेच विरोधकांनी दुबार मतदारांचा मुद्दा उचलून धरल्याने आयोगाने दुबार मतदारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
दुबार मतदारांसाठी डबल स्टारची प्रणाली लागू करण्यात आल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
त्यानुसार दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार असणार आहे. त्यामुळे दुबार नावे सहज समोर येतील.
डबल स्टार असणाऱ्या मतदाराकडून एकाच मतदानाची हमी घेतली जाणार आहे. त्याच्याकडून घोषणा पत्र लिहून घेतले जाईल.
ज्या मतदाराच्या नावापुढे डबल स्टार असेल तो मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, ते त्यांच्याकडून लिहून घेतलं जाईल.
त्याचवेळी त्याने मतदान केल्यानंतर तशी माहिती दुसऱ्या केंद्रावर देण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने यंत्रणेवर एक टूल विकसित केले आहे. या टुलद्वारे दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार करण्यात आले आहेत.
दुबार नावे असलेले मतदार दोन्हीकडे मतदान करतात त्यांना आता या निर्णयामुळे चाप बसणार आहे.