Pradeep Pendhare
Form 7 हा विद्यमान मतदार यादीतील एखाद्या नावाच्या समावेशावर आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्याची विनंती करण्यासाठीचा फॉर्म आहे.
सामान्यतः संबंधित मतदारसंघाच्या विद्यमान मतदार यादीत नाव असलेली व्यक्ती Form 7 द्वारे आक्षेप किंवा वगळण्याची विनंती करू शकते.
मतदाराचा मृत्यू, व्यक्ती अल्पवयीन, व्यक्ती कायमस्वरूपी दुसरीकडे स्थलांतरित होते, त्या व्यक्तीचे नाव आधीच दुसरीकडे नोंदलेले आहे अन् व्यक्ती भारतीय नागरिक नाही.
स्वतःचं नाव मतदार यादीतून हटवण्यासाठीही Form 7 वापरता येतो. सध्याच्या फॉर्ममध्ये यासाठी कायमस्वरूपी स्थलांतर, आधीच नोंद असणे किंवा भारतीय नागरिक नसणे, अशी कारणे दिली आहेत.
Form 7 भरताना अर्जदाराचे नाव, EPIC/Voter ID क्रमांक, मोबाइल क्रमांक, ज्या व्यक्तीच्या नावावर आक्षेप आहे तिचे नाव, EPIC क्रमांक, संबंधित व्यक्तीचा पत्ता नाव हटवताना गरजेचे आहे.
ECIच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आक्षेप किंवा नाव वगळण्याचे कारण सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदारावर असते. त्यामुळे केवळ अंदाजावर किंवा चुकीच्या माहितीवर Form 7 दाखल करता येत नाही.
Form 7 मधील declaration मध्ये अर्जदाराने दिलेली माहिती खरी असल्याचे घोषित करावे लागते. जाणूनबुजून खोटी घोषणा केल्यास कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागते. एक वर्षाचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
ECIच्या Voters Services Portal वर Form 7 साठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. ECIच्या अधिकृत Electors पेजवरही Form 7 ही "Deletion" सेवा म्हणून दिली आहे.